Home » बाळासाहेबांचा एक फोन आणि राज अलिबागच्या अर्ध्या रस्त्यातून परतले होते
आपलं राजकारण खास किस्से

बाळासाहेबांचा एक फोन आणि राज अलिबागच्या अर्ध्या रस्त्यातून परतले होते


ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नेहमी चर्चेत असणार कुटुंब आहे. राज आणि उद्धव पुन्हा एकत्र यावेत अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणूस करत असतो. राज आणि उद्धव यांचे राजकीय विचार कितीही वेगळे असले तरी त्यांचे बंधुत्वाचे बंध मात्र फार घट्ट आहेत. राज आणि उद्धव यांना जोडणारा दुवा म्हणजे बाळासाहेब होयं. आता बाळासाहेब नाहीत मात्र तरी देखील राज आणि उद्धव यांनी त्यांचे पारिवारीक संबंध चांगले ठेवले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडली आहे, आता त्यांना कधीही डिस्चार्ज मिळणार आहे.

पण यावेळेस देखील राज उद्धव यांना त्यांच्या गाडीतून घरी घेऊन जातील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 2012 साली असाच काही प्रसंग घडला होता आणि तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने भावांच्या नात्यातील एक सुखद क्षण अनुभवला होता.

2012 साली उद्धव ठाकरे यांना छातीत दुखू लागले, त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या चाचण्या पार पडल्या त्या नंतर राज ठाकरे स्वता गाडीचे सारथ्य करत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर घेऊन गेले होते. आता पुन्हा तसेच होणार का? हे काही वेळात स्पष्ट होईल पण राज लीलावतीत कसे पोहचले यांचा किस्सा देखील रंजक आहे.

मला वाटतं तू उद्धव सोबत असावं – 2012 रोजी राज ठाकरे अलिबाग दौऱ्यावर निघाले होते. ते अर्ध्या वाटेवर होते, तेव्हा अचानक राज यांना एक फोन आला आणि राज यांच्या गाड्यांचा ताफा अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मुंबईकडे वळला. हा फोन दूसरा तिसरा कोणाचा नसून बाळासाहेब ठाकरे यांचा होता.

बाळासाहेब यांनी राज यांना फोन केला आणि म्हणाले उद्धवच्या छातीत दुखत आहे, त्याला लिलावतीला घेऊन जात आहेत.जर तू तिथे असशील तर बरं होईल. राज यांनी फोन ठेवला आणि काही क्षणात राज मुंबईकडे रवाना झाले. आज पुन्हा उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे, राज आज देखील उद्धव यांना घरी सोडतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज त्यांच्या प्रसंगाविषयी म्हणतात मला त्या क्षणी अगदी मनापासून वाटलं होतं की मी तिथे असावं त्यामुळे मी कोणताचं विचार न करता लीलावतीमध्ये पोहचलो होतो. राजकारण राजकारणाच्या जागी असतं आणि कौटुंबिक नाती त्यांच्या जागी असतात.