पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळवण्यासाठी हौशी उमेदवारांना अजित पवार यांनी चांगलाच दम भरला आहे. आता मान खाली घालून हसू नका. विरोधकांना मदत करणं बंद करा, आधी असले धंदे बंद करा अजित पवार यांनी त्यांच्या स्टाइलने उमेदवार आणि कार्यकर्ते यांना सुनावले आहे (pimpri chinchwad mahanagar palika).
राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार अजित पवार यांना निवदेन देण्यासाठी आलेले होते. त्यावेळी अजितदादांनी त्यांना आपल्या खास शैलीत ठणकावले आहे. आपले गट-तट बाजूला ठेवा. मला पिंपरी- चिंचवड शहराची खडानखडा माहिती आहे. आता मान खाली घालून हसू नका, आधी तसले धंदे बंद करा असा सज्जड दम भरला आहे.
मी इथ् आलो तर लगेच मला गराडा घातला. दादा बघा, दादा मला बघा. निवडणुका जवळ आल्या की मला बघा. आता त्यांना चुकल्याचं कळत आहे. मी सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. आता महाविकास आघाडी आहे, सर्वांना प्रश्न पडला आहे की तिकीट वाटपाचं कसं होणार, पण कॉँग्रेसने आधीच जाहीर केलं आहे, ते स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा प्रश्न मिटला आहे.
तिकीट वाटप हे ताकदीच्या आधारावर होणार आहे. ज्यांची ताकद आहे, त्याला आधी संधी. एखाद्या ठिकाणी आपण एक-दोन पाऊले मागे होऊ पण पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता घालवणे हे आपलं ध्येय आहे. त्यामुळे कामाला लागा. तुम्हाला आणि मला दोघांना पुढं जायचं आहे. त्यामुळे आपण एकत्र काम करू.