Home » मनसे सोडणार असल्याच्या चर्चेवर बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले..
आपलं राजकारण

मनसे सोडणार असल्याच्या चर्चेवर बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले..


पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला रामराम ठोकला. रुपाली पाटील या मनसेच्या स्थापने पासूनच्या नेत्या होत्या तरी देखील त्यांनी पक्ष सोडला, यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. आता पुन्हा आणखी एक मोठे खिंडार पडणार असे मेसेज सध्या सोशल मिडियावर व्हायरलं होतं आहे.

बाळा नांदगावकर पुन्हा सेनेत परतणार, ते घर वापसी करणार अशा चर्चाना उधाण आले. यावर नांदगावकर यांनी स्पष्टीकरण दिले. सध्या राज पुणे दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि औरंगाबादला मी त्यांच्या सोबत होतो. मी मुंबईत परतलो. माझ्या मतदारसंघातील मनसेच्या कार्यालयांचे उद्घाटन आहे.

त्यांच्या तयारीसाठी मी मुंबईत पुन्हा परतलो. मी पुण्याच्या दौऱ्यावर न दिसल्यामुळे काहीनी मी शिवसेनेत प्रवेश करणार अशा वावड्या उठवल्या आहेत. मात्र त्यामध्ये काही सत्य नाही. असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.