Home » राजचं पहिलं भाषण फोनवर ऐकून बाळासाहेबांनी दिला होता हा सल्ला..
आपलं राजकारण खास किस्से

राजचं पहिलं भाषण फोनवर ऐकून बाळासाहेबांनी दिला होता हा सल्ला..

राज ठाकरे त्यांच्या झंझावती भाषणांसाठी संपूर्ण देशांत ओळखले जातात. राज यांच्या भाषणाचे मुद्दे हे रोखठोक आणि मनाला भिडणारे असतात, त्यामुळे राज यांच्या सभेला प्रचंड गर्दी होते, राज यांच्या बोलण्यातील तळमळ सर्वांच्या मनाला भिडून जाते, राज यांच्या भाषणात बाळासाहेबांची झलक दिसते, पण तुम्हाला हे माहीत आहे का? राज यांचे ते पहिले भाषण बाळासाहेबांनी चक्क टेलीफोनवरुन ऐकले होते,आणि राज यांना दोनच सल्ले दिले होते.

गोष्ट 90 च्या काळातील आहे, पावसाळी अधिवेशन सुरू होते, तेव्हा सेना विरोधी बाकावर होती, राज त्या काळी विद्यार्थी सेनेत होते, महाविद्यालयांच्या फी वाढी संदर्भात काही मागण्या संदर्भात राज ठाकरे यांनी भव्य मोर्चा काढला होता, काळा घोडा येथे हा मोर्चा संपणार होता, तेव्हा राज यांनी तेथे एक जोरदार भाषण केले होते, त्या काळी मोबाइल आणि इंटरनेट इतके काही नव्हते.

राज सभा संपल्या नंतर मीनाताई यांच्या सोबत मातोश्रीवर गेले, पण राज यांना हे माहीत नव्हते की त्यांचे हे पहिले भाषण बाळासाहेब यांनी टेली फोनवर ऐकले होते,राज यांच्या मोर्चाची सांगता जेथे झाली होती, तेथील एका दुकानदारांने बाळासाहेबांना राज यांचे भाषण फोनवरुन ऐकवले होते.

राज त्यानंतर मातोश्रीवर पोहचले तेव्हा बाळासाहेबांनी राज यांना जवळ बोलाविले आणि त्यांना म्हणाले मी तुला दोनच गोष्टी सांगणार आहे, ज्या दोन गोष्टी माझ्या बापाने मला सांगितल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे ज्या मैदानावर जाशील तेथील भाषा बोल, तसेच तुझी भाषा इतकी सोप्पी असावी की कुंपणावर बसलेल्या एखाद्या साध्या माणसाला देखील समजायला हवी.

दुसरी महत्वाची गोष्टी लक्षात ठेव तुझ्या बोलण्याने लोक शहाणे व्हावेत,आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी बोलू नकोस. बाळासाहेबांनी हे दोन सल्ले राज यांना दिले. त्यांच्या या दोन सल्यामुळे राज आज एक उत्तम वक्ते आहेत, त्यांच्या सभा इतक्या गाजतात..