Home » ‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; मविआला पाटलांचं खुलं आव्हान
आपलं राजकारण

‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; मविआला पाटलांचं खुलं आव्हान


निवडणुका बिनविरोध करू असा शब्द कॉंग्रेसने न पाळल्यामुळे निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळवता आला. तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरि यांना हरवून खंडेवाल मोठ्या फरकाने निवडणून आले आहेत. बावनकुळेच्या बाबतीत साई बाबांचं वाक्य खरं आहे, श्रद्धा आणि सबुरीच फळ मिळालं आहे, कॉंग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता, आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो त्यांनी नागपुरात बाहेरून आणलेला माणूस त्यालाही फसवलं.

आता माझं महाविकास आघाडीला माझं खूलं चॅलेंज आहे, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुफ्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा.रडीचा डाव खेळू नका. असंही पाटील म्हणाले. नागपूर निवडणुकीत ऐनवेळी घोडेबाजार होऊन देखील भाजपाचा विजय झाला आहे. नागपूर आणि अकोल्यातील जनतेचे आभार मानतो (Nagpur Vidhan Parishad Election).

ग्रामपंचायतिच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यात राज्यातील जनतेने भाजपाल प्राधान्य दिले आहे. नागपूरच्या बाबतीत उमेदवार बदलणं आणि घोडेबाजार करूनही मतदारांनी भाजपला पाठबळ दिलं. वसंत खंडेलवाल (vasant khandelwal) यांच्याकडे वंचित, श्रमिक घटकांनी भाजपाच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं 176 मतांनी बावकुळे आणि 186 मतांनी वसंत खंडेवाल विजयी झाले आहेत. असं दरेकर म्हणाले आहेत.