भाजप-राष्ट्रवादीतील वाद काही नवीन नाही. दोन्ही पक्षांमध्ये कायम आरोप प्रत्यारोप होताना दिसत असतात.शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या भाष्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणण मांडलंय. केंद्राने दिलेली ऑफर न स्वीकारण्याइतके पवार कच्च्या गुरूंचे चेले नाहीत. असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.(BJP Maharashtra Chief Chandrakant Patil on Sharad Pawar)
आता शरद पवार अगोदर काय म्हणाले होते? तर, सीबीआय आणि इडीकडून महावि आघाडी सरकार मधील अनेक नेत्यांना समन्स आणि चौकशीला समोर जावं लागतंय. त्यावर शरद पवारांनी टीका केली होती, “भाजपकडून आम्हाला सत्तेत येण्यासाठी ऑफर होती, मी नाही म्हटले म्हणून राष्टवादीला त्रास दिला जातोय”. त्यावर चंद्रकांत दादांनी प्रतिउत्तर दिल आहे.
पवार हे सगळ्यांचे गुरु आहेत. त्यामुळे शरद पवार आणि त्यांचे शिष्य काहीही होवो त्याचे खापर केंद्रावर फोडत आहेत. कोळश्याच्या बाबतीतही तसच झालं. पावसामुळे कोळसा कमी मिळेल वेळीच साठवून ठेवा, केंद्राने सांगितल असूनदेखील त्यांनी तो केला नाही. नाचता येईना अंगण वाकडे अशी स्तिथी सध्या त्यांची झालीये. असा सूचक टोला पाटलांनी लगावला.(central government offer to sharad pawar)
महाविकास आघाडीतील नेत्यांना काहीतरी ताटात पाडून घेता येईल यासाठी त्यांची नाराजी असते. काही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही. अस कॉंग्रेस च्या नाराजीवर त्यांनी म्हटल. नागपुरातही फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर टीका व्हायची. पण, आता नितीन राऊत झोप काढतात? असा सवाल देखील त्यांनी केला.(devendrafadnavis vs nitin raut)