Home » भाजपला मत द्या मी गाव जेवण देतो, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अजब ऑफर.
आपलं राजकारण काय चाललंय?

भाजपला मत द्या मी गाव जेवण देतो, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना अजब ऑफर.

जे गाव भाजपला आघाडी देणार त्या गावांना माझ्याकडून जेवण दिल जाईल. जेवणाच्या कार्यक्रमात मी सुद्धा सहभागी असेल, अस अजब विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. देगलूर – बिलोली विधानसभेची पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आगळी वेगळी ऑफर देण्याचा हा फंडा पाटलांनी शोधून काढलय! (deglur biloli vidhan sabha)
भाजपने अनेक नेत्यांना देगलूर बिलोली विधान सभेच्या पोटनिवडणुकी साठी तयार केले आहे. पाटील यांनी काल कार्यकर्त्याना अजब ऑफर दिल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. जे गाव भाजपला आघाडी देणार त्या गावांना माझ्याकडून जेवण दिल जाईल, व त्यात मी सुद्धा सहभागी असेल अस चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले.

भाजपाचा अनेक नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

दरम्यान जिल्ह्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जोरदार प्रचार करायला सुरवात केली आहे. आतापर्यंत आशिष शेलार, भागवत कराड, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवेंसह अनेक बडे नेते प्रचासाठी मतदारसंघात येतांना दिसत आहे.