Home » यांना बायका मारतील आणि नाव केंद्राच सांगतील! देवेंद्र फडणवीसांचा टोला
आपलं राजकारण

यांना बायका मारतील आणि नाव केंद्राच सांगतील! देवेंद्र फडणवीसांचा टोला

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत जोरदार निशाना साधला..

मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र सरकार विकासाच्या नावाने फक्त भ्रष्टाचार करत आहेत. हे सरकार खूप खोट बोलतं, वांर वार केंद्राकडे बोट दाखवायची यांना सवय आहे. यांना बायका मारतील आणि नाव केंद्राच सांगतील! असा हि खोचक टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

गेल्या दीड वर्षात अनेक नैसर्गिक कारणांमुळे नुकसान झाले. वारे,वादळ,महापूर ,अतिव्रष्टी अश्या अनेक कारणांमुळे महारष्ट्रात आतोनात नुकसान झाले, याची मुख्यता शेतकर्यांना झळ बसली आहे. अश्या शेतकर्यांना त्यांच्या पिक विम्याचे पैसे सुद्धा नीट व्यवस्थित या सरकारने दिली नाही. ह्या सरकारला फक्त खोट बोलायची सवय आहे. काही झालं कि केंद्राला जबाबदार धरत अस देवेंद्र फडणीस यांनी देगलूर येथे प्रचारादरम्यान बोलले.

भागवत कराड यांनी पिक विमा कंपनीची बैठक घेताच धक्कादायक माहिती समोर आली, विमा कंपन्यांनी त्यांना सांगितले कि, राज्य सरकाने त्यांच्या वाट्याचे सतराशे कोटी रुपये भरले नसल्याने आंम्ही कसे पैसे देऊ. राज्य सरकारने पैसे भरले असते तर आम्ही चार हजार कोटी रुपये दिले असते, म्हणून महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यासाठी सातशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आपल सरकार होत तेव्हा आपण एका जिल्ह्यासाठी पाचशे कोटी रुपयाची मदत केली होती अस फडणवीस यांनी म्हटले आहे.