विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नोकर भरती घोटाळ्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झाली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे विधानसभेत आभार मानले. प्रकाश शेंडगे यांच्याकडे असलेल्या ऑडियो क्लिपचा संदर्भ देत फडणवीस यांनी रेटकार्डस आणि मोडस ऑपरेडी विधानसभेत वाचुन दाखविले. अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत.
न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2021 ला अपात्र ठरवलं गेलं. त्या नंतर 4 मार्च 2021 ला हायकोर्टाच्या निर्णयाला पात्र केलं. मात्र चार कंपन्या डावलून न्यासाला काम दिलं. त्यानंतर आरोग्य घोटाळा झाला. म्हाडा भरतीत घोटाळा झाला. टीईटीमध्ये घोटाळा झाला.
या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही. हे सगळे घोटाळे या ठिकाणी चालले आहेत. 25 आणि 26 सप्टेंबर परीक्षा घेतली. न्यासानं या परीक्षेस पेपर फोडण्यापासून सर्व गोष्टी फोडण्यापर्यत सर्व काम केली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.