धर्मवीर हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. या चित्रपटांची उत्सुकता सर्वत्र आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते संपूर्ण जिल्ह्याचा सेनेचा अध्यक्ष असा दिघे यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. असं म्हटलं जातं की राजकारणात यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणत्या तरी राजकीय घरात जन्म घेणे गरजेचे असते, हा समज दिघे यांनी खोडून टाकला आहे. आनंद दिघे यांना ठाण्याचे बाळासाहेब असं म्हटलं जात होतं.
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात आधी जनता दरबार त्यांनीच भरवला होता. आनंद दिघे यांनी स्वताला दिवसरात्र सामाजिक कामांसाठी वाहू घेतले होते, ते सकाळी 6 पासून ते रात्री दिवसभर ते लोकांचे प्रश्न सोडवत.आनंद दिघे हे त्यांच्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते.
24 ऑगस्ट 2001 रोजी एका कार्यक्रमाला जात होते, तेव्हा त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला,त्यांच्या झाला, त्यांच्या पायाला अनौ डोक्याला मोठी जखम झाली होती. उपचारासाठी त्यांना सिंघानिया हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. 26 ऑगस्ट रोजी त्यांना पहिला हार्ट अटॅक आला, त्या नंतर त्यांची प्रकृती खूप खालावली, त्यांना हार्ट अटॅक आला आहे, ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.
शेकडो शिवसेना कार्यकर्ते हॉस्पिटल बाहेर जमा झाले, काही वेळात दिघे यांना दूसरा हार्ट अटॅक आला, आणि दिघे यांनी जगाचा निरोप घेतला. ही गोष्ट शिवसैनिकांना समजताच शिवसैनिकांनी सिंघानिया हॉस्पिटल पेटवून दिले. या गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली.
आनंद दिघे यांच्या मृत्यु बाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात, असे म्हटले जाते की आनंद दिघे यांची प्रसिद्धी बाळासाहेबांना देखील धोकादायक वाटतं होती. त्यामुळे त्यांनी आनंद यांना संपविले असे अनेक तर्क-वितर्क समोर येत आहेत.
पण काही राजकीय अभ्यासक म्हणतात ही बाब खोटी आहे. बाळासाहेब हे संपूर्ण देशांत प्रसिद्ध होते ते त्यांच्या कट्टर हिंदुत्व धोरणामुळे,आनंद दिघे यांचे काम फक्त ठाण्यापूरते मर्यादित होते. आता जेव्हा चित्रपट समोर येईल तेव्हा खरे आणि खोटे समोर येईल.