Home » इंदिरा गांधी सोनियांना पहिल्याच भेटीत म्हणाल्या घाबरू नको मी पण प्रेम केलं होतं
आपलं राजकारण

इंदिरा गांधी सोनियांना पहिल्याच भेटीत म्हणाल्या घाबरू नको मी पण प्रेम केलं होतं


इंदिरा गांधी म्हणजे भारताच्या आर्यन लेडी (Indira Gandhi). त्यांच्या कडक स्वभावामुळे आणि त्यांच्या तडक निर्णय क्षमतेमुळे इंदिरा गांधी अजून देखील चर्चेत असतात. इंदिरा गांधी यांच्या निर्णयांची संपूर्ण जगात चर्चा होते. त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी त्यांच्या आणि इंदिरा गांधी यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

इंदिरा गांधी यांना जेव्हा राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि सोनिया यांच्या प्रेम प्रकरणाविषयी समजले तेव्हा इंदिरा गांधी न्यूयार्क दौऱ्यावर होत्या, त्या अचानक लंडन येथे थांबल्या, आणि राजीव यांना त्या म्हणाल्या मला सोनियाला भेटायचे आहे. सोनिया इंदिरा यांना भेटायला आल्या, सोनिया प्रचंड घाबरलेल्या होत्या. सामान्य मुलीप्रमाणे त्यांना देखील खूप टेंशन आले होते. सोनिया घाबरलेल्या होत्या, त्यांना पाहाताच इंदिरा त्यांना म्हणाल्या घाबरू नकोस, मी देखील प्रेम केलं होतं.

इंदिरा यांनी सोनिया यांना पहिलं रीलॅक्स केलं आणि नंतर त्यांच्याशी गप्पा मारल्या. सोनियांना फार चांगलं इंग्लिश देखील येत नव्हतं. तेव्हा इंदिरा यांनी फ्रेंच भाषेत सोनियांची विचारपूस केली होती. सोनिया गांधी इंदिरा यांच्याविषयी म्हणतात त्या खूप कणखर स्त्री होत्या, एक मायाळू आई होत्या आणि एक क्युट सासू होत्या.

सोनिया म्हणतात मला स्वताला राजकारण अजिबात रस नव्हता राजीव यांनी राजकारणात येऊ नये असं मला वाटतं पण इंदिरा गांधी यांच्यामुळे मी राजकारणात आले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मी चालत आहे. सोनिया गांधी यांची राजकीय कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली आहे.

सोनिया मूळच्या इटलीच्या (Italy) असल्यामुळे त्यांना स्वीकारणे थोडे भारतीय लोकांना अवघड झाले. त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका झाली. पण सोनिया यांनी मोठ्या शांतेत सर्व घेतले. त्यांनी आपली संस्कृती स्वीकारली. भाषा शिकली. आणि भारतीय राजकारणात त्यांनी स्वताची वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय राजकारणात त्यांनी स्वताचे एक स्थान निर्माण केले आहे.