Home » पवार म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण मराठवाड्याच्या या तरुणाने बदलून दाखवलं होत
आपलं राजकारण खास किस्से

पवार म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण मराठवाड्याच्या या तरुणाने बदलून दाखवलं होत

महाराष्ट्र आणि शरद पवार हे एक पक्क समीकरण होतं,हे समीकरण ज्या व्यक्तीने मोडलं ते व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे होयं. योगायोग म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचा जन्म दिवस एका दिवशीच असतो. शरद पवार यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीत एक काळ विशेष गाजला होता.

मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.त्यामुळे महाराष्ट्राचा कानाकोपरा मुंडे यांना माहीत होता त्याबाबत पवारांच्या खालोखाल मुंडे यांची ख्याती होती. शरद पवार नेहमी म्हणत गोपीनाथ मुंडे आणि घडयाळ यांच नाते कधीच जमले नाही. घडयाळ म्हणजे वेळ आणि गोपीनाथ मुंडे कधीच कार्यक्रमाला वेळेवर गेले नाहीत. दुसरे घडयाळ म्हणजे राष्ट्रवादी, त्याचं कधीच राष्ट्रवादी सोबत जमलं नाही.

सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जेव्हा मुंडे सभागुहात उभे राहत तेव्हा धडकी भरत. भाषण करताना हातात जो कागद असेल तो फडकावत ते भाषण करत ,घणाघाती हल्ले करत पाहाणाऱ्यांना वाटतं मुंडे काही पुरावे हातात घेऊन बोलत पण तसे काही नसत ते कोरेकरकरीत कागद असत. पण मुंडे यांची ती एक स्टाइल होती.

मुंडे बोलताना नेहमी राव आईकांना असे म्हणणत. नव्या उत्साहाने ते आपली बाजू मांडत असे, मुंडे बोलायला उभे राहिले की सर्व चित्र पाटलून जात. त्यांची एक खास स्टाइल अजून देखील महाराष्ट्र विसरला नाही ती स्टाइल म्हणजे त्याचं भाषण उत्तम झालं की ते खाली बसताना खिशातून कंगवा काढत आणि केसांवर फिरवत आणि नंतर पत्रकारांकडे पाहत. फोटोग्राफर त्यांचा एक उत्तम फोटो घेत.

रडायचं नाही लढायचं – 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या भाजपला राज्यांमध्ये आपलीच सत्ता येणार याची पूर्ण खात्री होती. मात्र जनतेने अनाकलनीयपणे कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे सर्वत्र सुतकी वातावरण होते. त्यावेळी मुंडे काय प्रतिक्रिया देतील यांच्याकडे सर्वांचे लक्ष देते. तेव्हा मुंडे पक्षाच्या कार्यालयात आले आता ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष होते, मुंडे म्हणाले आता रडायचं नाही लढायचं.