हार्दिक पटेल गुजरातसह संपूर्ण देशांत युवक नेत्यांमध्ये घेतले जाणारे एक वादग्रस्त नाव. 2016 पासून हार्दिक सतत चर्चेत होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याला गुजरात युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील दिले होते, पण त्यांची नाराजी दुरू करण्यात कॉंग्रेसला मात्र यश आले नाही,अखरे हार्दिक पटेलने आज राजीनामा दिला, राजीनामा पत्रात त्याने भरभरून भाजपावर स्तुती सुमणे उधळली तर कॉंग्रेसवर जोरदार तोफ डागली आहे.
हार्दिक पटेल याने सोनिया गांधी यांना पत्र लिहून काही मुद्दे मांडले आहेत. त्याने हे पत्र ट्वीटरवर ट्विट केले आहे. हार्दिक म्हणतो कॉंग्रेस नेहमी देशविरोधी निर्णय घेत आहे. देशाला CAA- NRC, कलम 370, जीएसटी यासारख्या गोष्टी हव्या होत्या, कॉंग्रेसने मात्र नेहमी या गोष्टीना विरोध केला.
गुजरातमध्ये नेत्यांचे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष नसून त्यांना फक्त आर्थिक फायदा हवा आहे. माझ्या सारखे कॉंग्रेस कार्यकर्ते स्व खर्चाने जनतेपर्यन्त पोहचतात आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतात, पण कॉंग्रेसमधील मोठे नेते मात्र दिल्लीतील आलेल्या मोठ्या नेत्यांना चिकन सॅंडविच भेटले का यांची चिंता करतात.
कॉंग्रेसच्या नेत्यांचे फक्त मोबाईल आणि चिकन सॅंडविच यावर लक्ष आहे, त्यांना जनतेच्या प्रश्न त्यांच्याशी घेणे-देणे नाही. अयोध्या राम मंदिर, जम्मू काश्मीर अशा प्रश्नाचे उत्तर जनतेला हवे होते, कॉंग्रेस मात्र त्या विरोधी भूमिका घेत होते. देशांत आणि प्रत्येक राज्यांत कॉंग्रेस ला नाकारले जात आहे. जेव्हा जनता संकटात असते तेव्हा कॉंग्रेसचे नेते परदेशांत असतात.