राजकारण सोप्प नसतं,कारण राजकारणात एकेकाळी गळ्यात गळे घालुन फिरणारे दुसऱ्या वेळी कट्टर विरोधक होतात. महाराष्ट्रात सध्या हेच चित्र दिसत आहे,मनसे विरुद्ध शिवसेना उभी टाकली आहे. आरोप- प्रत्याआरोपाचं राजकारण जोर धरत आहे. शिवसेनेतून सध्या एक महिला कार्यकर्ते मनसेला चांगलीच धारेवर धरत आहे. ही महिला कार्यकर्ता साऱ्या महाराष्ट्राच्या ओळखीची आहे.एकेकाळी तीच्या नृत्य कलेचे महाराष्ट्राने तोंड भरून कौतुक देखील केले होते.
ही कार्यकर्ती दुसरी -तिसरी कोणी नसून, ही आहे दिपाली सय्यद (Deepali Sayed). दीपाली सध्या मनसेला (raj thackeray mns) देत असलेल्या प्रतिउत्तरांमुळे जरी चर्चेत असली तरी मध्यंतरी तीच्या आडनावांमुळे ती भलतीच चर्चेत होती. दीपाली नाव जरी मराठी असलं तरी तिचं आडनाव सय्यद मात्र अनेक प्रश्न उभे करतं होतं. आजच्या लेखात आपण भोसलेंची मुलगी दीपाली, सय्यदांची सून सोफिया कशी बनली हा इतिहास जाणून घेणार आहोत.
मुंबईतील भोसले कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. आई -वडिलांनी नाव ठेवलं दीपाली, दीपालीचं सौन्दर्य तीच्या नावा प्रमाणेच दिपवून टाकणारं होतं. दीपालीच्या पायात भिंगरी होती, ती सुंदर नृत्य करत होती. तीने पुढे जाऊन नृत्य कलेत डिग्री घेतली. देखणं रूप आणि पायात कला हे हेरून दीपालीला अनेक मराठी मालिकांच्या ऑफर आल्या.
बंदिनी, दूर्वा अशा अनेक गाजलेल्या मालिका तीने केल्या. चित्रपटांत देखील झळकली. नृत्यावर प्रेम असणारी दीपाली,नृत्य दिग्दर्शक बॉबी खान यांच्या प्रेमात पडली. दीपालीने थेट तीच्या वडिलांसमोर तीच्या प्रेमाची कबुली दिली. वडील देखील पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी आनंदाने दिपालीच्या लग्नाला परवानगी दिली. घरच्यांचा विरोध नव्हता पण समाजाने मात्र खूप त्रास दिला.
आंतरधर्मीय विवाह केला म्हणून नावं ठेवलं पण दीपालीच्या सासर आणि माहेरच्या लोकांनी तिला खूप साथ दिली. लग्नानंतर दीपालीचे नाव बदलण्यात आले, दीपाली भोसलेची (deepali bhosale) ती सोफिया जहांगीर सैय्यद बनली. लग्नानंतर तीने अनेक मालिका केल्या. सिनेमात काम केले. डान्सचे शो देखील जिंकले. तीस एक मराठी सिनेमे, नऊ -दहा मालिका , चार एक भोजपुरी सिनेमात काम केल्यानंतर २०१४ साली अचानक दीपालीने राजकारणात पाऊल ठेवले.
अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात प्रवेश केला. अहमदनगर मधून लोकसभेची निवडणूक देखील लढविली. पण सय्यद आडनाव, मोदी लाट, बाहेरून आलेली उमेदवार यामुळे दीपाली यांचा पराभव झाला. तरी देखील दीपालीने नगर काही सोडले नाही, पाच वर्ष तेथे सामाजिक काम केले. त्या नंतर काही दिवस शिवसंग्राम पक्षात काम केले. पुढे शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. सेनेच्या तिकीटांवर मुंबईतून लोकसभा देखील लढविली पण तेथे देखील पराभव पहावा लागला.
दीपाली यांना राजकारणात अजून म्हणावे तितके यश मिळाले नसले तरी त्या त्यांचे सामाजिक कार्य नेटाने करत आहेत. सध्या दीपाली मनसेवर जोरदार निशाणा साधत आहेत. त्यांना यांचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.