Home » अयोध्या प्रकरण सोडा.. तब्बल 5 वेळा राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका बदलली आहे
आपलं राजकारण

अयोध्या प्रकरण सोडा.. तब्बल 5 वेळा राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका बदलली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल पुण्यात सभा झाली. सभेत अनेक मुद्दे मांडतांना त्यांनी अयोध्या दौरा स्थगित का झाला याचंही कारण लागलीच सांगून टाकलं. सभेत आपल्या ठाकरी शैलीत अनेक टोमणे मारले, शिवसेनेपासून भाजपर्यंत सगळ्यांना चोख उत्तर दिली. पण मग मंडळी मुद्दा पुन्हा उपस्थित राहिला कि आत्ता तात्पुरता काही कारणामुळे स्थगित झालेला अयोध्येचा दौरा. कारण या वादात उत्तर प्रदेशची भाजप सक्रीय आहे. ब्रिजभूषन सिंह यांनी स्पष्ट सांगितल होत कि राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाउल ठेवू देणार नाही. विरोधकांना मुद्दा मिळाला कि एका खासदाराच्या धमकीमुळे राज यांनी दौरा स्थगित केला आणि नेहमीसारखीच राज ठाकरेंनी पुन्हा पलटी मारली वगैरे.

पण मग आम्ही शोधलं खरच राज ठाकरेंनी याआधी भूमिका घेऊन माघार घेतलीये का? तर उत्तर आहे हो. याआधी एकदा नाही तब्बल ५ वेळा त्यांनी घेतलेली भूमिका बदलली आहे.

पहिली फिरकी घेतली ती वर्ष २०१४ मध्ये

पक्षाचं मनोबल वाढावं म्हणून राज ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमय्या मैदानातील सभेत केली होती. इतकंच नाही, तर जनतेने कौल दिला तर नेतृत्व देखील करणार असंही जाहीर केलं होतं. पण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रच हा माझा मतदारसंघ असल्याचं म्हणत त्यांनी सरळ माघार घेतली.

पाकिस्तानी कलाकारांना केलेला विरोध

उरी येथे दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी मनसेन भूमिका घेतली होती. कि पाकिस्तानी कलाकारांना काम करू देणार नाही. चित्रपट निर्मात्यांना सक्त ताकीद होती कि पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नका. त्यामुळे ‘ये दिल है मुश्कील’ चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर हा मुद्दा मार्गी लागला. त्यावेळी बराच तोटा होऊनही चित्रपट अखेर प्रदर्शित झाला होता.

तिसरी गोष्ट झाली ती ऑगस्ट २०१९ मध्ये

त्यावेळी राज यांच्या लाव रे तो व्हिडिओ मुद्दा प्रचंड गाजला आणि लोकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला. मोदींच्या विरोधात प्रचार करत असताना, EVM विरोधात देखील मोठ आंदोलन करून त्याच नेतृत्व करणार अशी भूमिका राज यांनी घेतली होती. मात्र काहीच दिवसात ED ने चौकशीला बोलावल आणि राज ठाकरे पुन्हा मावळ झाले. आणि आंदोलन मधेच थंड झालं.

केंद्र सरकारच्या NRC आणि CAA कायद्याला दिलेलं समर्थन विसरता येणार नाही

तर झालेलं असं कि केंद्र CAA आणि NRC बिल पास केलं. २०२० मध्ये राज ठाकरेंनी त्या कायद्याला पाठींबा दर्शवला. आणि आधी पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकला अशी भूमिका घेतली. पण लगेच पुढे एका महिन्यात राज यांनी भूमिका मावळ केली. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला अस सांगून त्यांनी माघार घेताना सारवासारव केलेली जनतेने पहिली.

शेवटचा आणि आणखी एक मुद्दा तो म्हणजे 3 मे चा

यावेळीही राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा हाती घेतला. राज ठाकरेंनी सरकारला शेवटची तारीख देऊन ताकीदही दिली होती. कि ३ मे पर्यंत जर भोंगे हटवले नाहीत तर परिणामांना समोर जा. या मुद्द्यावर मनसे कार्यकर्त्यांनी अक्षरशः रान पेटवल. सगळे कार्यकर्ते हनुमान चालीसेसाठी सज्ज होते. पण याही वेळी राज ठाकरेंनी एनवेळी ३ तारखेचा अल्टीमेटम होता आणि अक्षय तृतीयेला महाआरती घेण्यात येणार होती. पण रमजान ईदचे कारण पुढे करून तो कार्यक्रम पुन्हा रद्द झाला आणि त्या दिवशी कार्यकर्ते मागे झाले.