काल संपूर्ण देशांत पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने जबरदस्त कामगिरी केली आहे. कॉंग्रेस मात्र रसातळाला गेली आहे. काल संपूर्ण दिवस दोन पक्षाची चर्चा होती ते दोन पक्ष म्हणजे भाजपा आणि आम आदमी पार्टी, आम आदमी पार्टीला स्थापन करून अवघे 7 वर्ष झाले आहेत, पण या सात वर्षात आम आदमी पार्टीने तब्बल दोन राज्यात त्यांची एक हाती सत्ता आणली आहे.
दिल्ली आणि पंजाब. काल झालेल्या निडणुकीत आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये जोरदार यश मिळवले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला होता. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. पण कालच्या विजयाने केजरीवाल यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये आज तकच्या एका कार्यक्रमात अरविंद केजरीवाल आले होते.
त्यांनी तेथे पेपरवर तीन गोष्टी या निवडणुकीत होतील असे लिहिले होते.पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव होईल. भगवंत मान यांचा 50 हजारा पेक्षा जास्त मतांनी विजय आणि बलाढ्य बादल कुटुंबातील एकही व्यक्ती निवडनू येणार नाही. या तिन्ही गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत.
केजरीवाल यांनी ज्या कॉन्फिडन्सने ही निवडणूक लढली आणि जिंकली यांची चर्चा सर्वत्र होत आहे. केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर अनेक चांगले बदल केले आहेत. मोफत वीज, उत्तम शिक्षण या केजरीवाल यांनी केलेल्या गोष्टीची संपूर्ण देशांत चर्चा आहे.