Home » मोदी सरकारच्या बजेटमध्ये हे महागणार हे स्वस्त होणार
आपलं राजकारण काय चाललंय?

मोदी सरकारच्या बजेटमध्ये हे महागणार हे स्वस्त होणार

यंदाचे आर्थिक बजेट म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आला आहे. महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. मोबाइल फोन , चार्जर, कॅमेरा, लेन्स आदी इलेक्ट्रिक वस्तुसह कपडे आणि चामडयाच्या वस्तु स्वस्त होणार आहेत. त्यामुळे यंदाचे बजेट हे कभी खुशी कभी गम असे आहे.

यंदाच्या बजेटमध्ये कर रचनेत कोणताच बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती आणि मेडिकल म्हणजेच आरोग्य या दोन्ही क्षेत्रावर फोकस करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यांचे भाषण तब्बल दोन तास चालले या दोन तासात त्यांनी पुढील संपूर्ण वर्षात अर्थ मंत्रालय आणि देशांचा एकूण विकास कशा प्रकारे होणार आहे हे व्हीजन मांडले आहे.मोबाइल चार्जर महागणार आहेत.

देशाअंतर्गत निर्माण होणारे मोबाइल फोन मात्र स्वस्त होणार आहेत. देशाअंतर्गत मोबाइल निर्मिती अधिक प्रमाणात व्हावी यासाठी अनेक नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही केमिकल्स वरील कस्टम ड्यूटी हटवली आहे. त्यामध्ये मिथेनॉल यांचा देखील समावेश आहे. देशाअंतर्गत उत्पादन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय होणार स्वस्त ‘
चामडे
बूट
चप्पल
विदेशी सामान
कपडे
शेतीशी विषय वस्तु
पॅकेजिंग डब्बे
पॉलिश केलेले डायमंड
परदेश छत्र्या
मोबाइल फोन
मोबाइल चार्जर
जेम्स अँड ज्वेलरी
काय महागणार
कॅपिटल्स गूडसवर आयात शुल्कवरील सूट रद्द करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या बजेटमध्ये हे महागणार हे स्वस्त होणार..