Home » विरोधक म्हणून वावर असणारे चंद्रकांत जाधव 15 दिवसांत थेट विधानसभेवर गेले होते
आपलं राजकारण काय चाललंय?

विरोधक म्हणून वावर असणारे चंद्रकांत जाधव 15 दिवसांत थेट विधानसभेवर गेले होते


कोल्हापुर म्हणजे महाराष्ट्रातील खेळांची भूमी होयं. कुस्ती हे कोल्हापूरकरांच पहिलं प्रेम पण इतर खेळांना देखील कोल्हापूरकर तितकेच जवळ करतात. सामान्य नागरिक, उद्योजक आणि चक्क राजकारणी देखील खेळाचा छंद जोपासतात हे फक्त कोल्हापुरात होऊ शकते.

आता हेच पहा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील आमदार चंद्रकांत जाधव यांना देखील फुटबॉलची प्रचंड आवड होती. आटीयआयच्या राज्य फुटबॉल स्पर्धा देखील ते खेळले होते. तसेच तेथे ते नंबर एक नंबरवर होते. कोल्हापुरात ते फुटबॉल हीरो म्हणून ओळखले जात.

उद्योजक म्हणून देखील जाधव यांचे नाव प्रसिद्ध होते. जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रिज अशा अनेक व्यवसायात जाधव यांनी दमदार कामगिरी केली होती. एक यशस्वी उद्योजक, एक यशस्वी राजकारणी देखील होते पण या बरोबरच ते एक चांगला माणूस म्हणून अधिक ओळखले जात.

उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असत. जाधव कुटुंब कोल्हापुरात नेहमी विरोधी बाकावरच बसलेले आहे. चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेसाठी एकदा सेनेकडे उमेदवारी मागितली होती पण त्यांना ती नाकारली गेली. जाधव यांनी त्यांच्या भावास म्हणजे संभाजी यांना तीन वेळा भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले. पत्नी प्रेमला यांना देखील पालिकेत भाजपाच्या तिकीटांवर धाडले.

विधानसभेसाठी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे दोन वेळा विजयी झालेले आमदार राजेश क्षीरसागर यांचा जोरदार पराभव केला. कॉंग्रेसकडून अवघ्या 15 दिवसांत तिकीट मिळवून, प्रचार करून निवडणूक जिंकले आणि जाधव थेट 15 दिवसांत विधानसभेवर पोहचले.