दिल्लीच्या सीमारेषांवर मागील एक वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू होते. मोदी सरकारने ते कृषि कायदे मागे घेतले आणि आंदोलक शेतकरी पुन्हा घरी परतले. मात्र या आंदोलना दरम्यान एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या गाडीने चिरडल्याचे प्रकरण घडले होते. हे प्रकरण अजून देखील मार्गी लागलेले नाही.
या मुद्द्यावरून कॉँग्रेसने सत्ताधारी भाजपावर टीका केली आहे. त्या केंद्रीय मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी राजीनामा द्यावा. ते तुरुंगात जाईपर्यत आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकत राहू. त्यासाठी 5 ,10किंवा 15 वर्ष लागोत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.