Home » हा तर हेमा मालिनींचा आदर, राऊतांकडून पाटलांचे समर्थन
आपलं राजकारण

हा तर हेमा मालिनींचा आदर, राऊतांकडून पाटलांचे समर्थन


माझ्या मतदार संघातील रस्ते हेमामालिनी यांच्या गालांसारखे आहेत, असे विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. गुलाब राव पाटील यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार आक्षेप घेतला आहे. आता मात्र हेमामालिनी देखील चांगल्याच संतापल्या, त्या म्हणाल्या सामान्य लोक बोलतात मी समजू शकते, पण जबाबदार नेते आणि संसदेचे सदस्य असे बोलतात म्हणजे विशेष आहे. संसदीय राजकारणातील लोकांनी असे विधान करू नये. अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली.

मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र पाटीलांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. या प्रकरची तुलना आधीच झाली आहे. हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका. लालू प्रसाद यादव यांनी देखील हे उदाहरण दिलं होतं. आम्ही सर्वजण हेमा मालिनी यांचा आदर करतो.