आमच्यासाठी सर्व रस्ते खुले आहेत. असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला होता, आता सेनेने आव्हाडांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. आघाडी केली म्हणजे सर्वांनी शंभर टक्के आघाडीत आलं पाहिजे असं नाही. कुणालाही कसलेही बंधन नाही. असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
विनायक राऊत पुढे म्हणाले जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे एक अभ्यासू नेते आहेत. आघाडीसाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. उलट महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत या विचारांचे ते आहेत. पण काही वैचारिक मतभेद असतील तर ते दूर केले जातील.
मात्र मोठ्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील हे सर्वांचे मत आहे. महाविकास आघाडी जरी असली तरी सर्व पक्ष स्वातंत्र्य आहेत. दरवेळी आघाडी, किंवा महाआघाडी व्हावे असे नाही. भाजपा आणि आव्हाड यांच्यात किती अंतर आहे हे मला देखील माहीत नाही असे विनायक राऊत म्हणाले.