Home » हजारो कोटींच्या घोटाळ्यांमुळे सहकार चळवळ मागे पडली? अमित शाह यांचा सवाल
आपलं राजकारण

हजारो कोटींच्या घोटाळ्यांमुळे सहकार चळवळ मागे पडली? अमित शाह यांचा सवाल


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगरमध्ये देशातील पहिली सहकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी तूफान टोलेबाजी केली. केंद्रात पहिल्यांदा सहकार हे देखील खात सुरू करण्यात आलं आहे. त्या नंतर पहिल्यांदाच ही सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सध्या अनेक घडामोडी घडल्या यावर अमित शहा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात सहकार चळवळ मागे का पडली आहे. यांचा अभ्यास करायला हवा. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोष देखील आपण दूर करायला हवेत. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तर मोदी सरकार 24 तास मदत करण्यास तयार आहे. असं देखील अमित शहा म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँका होत्या.

या बँकेचे जाळे किती मोठे होते. आता कुठे गेल्या जिल्हा बँका. आता केवळ तीन जिल्हा बँका राहिल्या आहेत. हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले, ते काय रिझर्व्ह बँकेने केले का? नाही नाही रिझर्व्ह बँकेने केले नाहीत. मी राजकीय भाष्य करण्यास आलो नाही. पण सहकार क्षेत्रासाठी आंदोलने झाली पाहिजेत.

आंदोलनकर्त्यांना मी जरूर सांगेन, सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्या सोबत आहे. सहकारिता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यवसायिकता आणली पाहिजे, मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना आंदोलनात सहभागी करायला हवे.

नव्या नेतृत्वाकडे त्यांची धुरा द्यायला हवी. तर सहकार टिकून राहील. प्रवरानगर ही सहकाराची काशी आहे. त्या काळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजय गाडगीळ यांनी सहकारी चळवळ रोवली. सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवं. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यांत चळवळ उभी केली. मोदींनी सहकारिता सहकार मंत्रालय तयार केलं.