महाराष्ट्रात आता अनेक मोठ्या महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, आता गाजणाऱ्या सभा, मोर्चे, आंदोलनं यांना पैसा कसा मिळतो तेही समजून घ्या!
सभा, मोर्चे आणि आंदोलने घेणे इतके सोप्पे नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. पण आजच्या महागाईच्या जमान्यात लोक स्वतच्या खिशातून दहा रुपये लवकर काढत नाही. मग कार्यकर्ते भले मोठे बॅनर कसे काय लावतात?
आजच्या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत. राजकीय पार्ट्याच्या सभा, मोर्चे आणि आंदोलने यांचा खर्च कोण करतं. सर्व राजकीय पार्ट्यांना सर्वाधिक मदत ही देणग्यातून मिळते. कार्यकर्ते त्यांच्या पक्षाला देणगी देत असतात. या बरोबरच सर्व पक्षांच्या बँकेत काही ठेवी असतात. त्या ठेवीवर देखील व्याज मिळते. या बरोबरच आमदार, खासदार हे देखील त्यांच्या पक्षांना मदत करत असतात.
भाजपा हा सर्वाधिक खर्च करणारा पक्ष आहे. भाजपा सर्वाधिक खर्च हा निवडणूक आणि प्रचार यावर करतो. प्रत्येक पक्षाला ऑडिट रीपोर्ट देखील सादर करावा लागतो. या बरोबरच अनेक मोठे व्यापारी, मिलर्स देखील अनेक पार्ट्यांना मदत करत असतात. यामागे त्यांचा काही स्वार्थ असतो. ही वेगळी गोष्ट आहे.
कार्यकर्त्याचा खर्च वाढला
पूर्वी प्रत्येक पक्षांचे कट्टर कार्यकर्ते असायचे. त्यामुळे सभांना हे कार्यकर्ते गर्दी करत असत. पण आता कट्टर कार्यकर्ते देखील मिळणे दुर्मिळ झाले आहे. सभांना गर्दी झाली तरच पक्षांची ताकद दिसून येईल, त्यामुळे पैसे वाटून कार्यकर्ते आणावे लागतात. सभा, मोर्चे आणि आंदोलने हे घेणे काही सोप्पं नाही.