मतदार संघातील नवगण राजुरी ग्रामपंचायत एका जागेची पोटनिवडणूक होती. शिवसेना नेते काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एका जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. नवगण राजुरी हे दोन्ही ही क्षीरसागरांचे मूळ गाव आहे. त्यामुळे काका- पुतणे एका जागेवर आमने- सामने आल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. मात्र मतदारांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांना कौल दिला. क्षीरसागर कुटुंबियांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले.
नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत मधील एक सदस्यांचा मृत्यु झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांनी जोर लावला होता.
संदीप क्षीरसागर यांचे पॅनल विजयी झाले आहे. नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत मधील एका सदस्यांचा मृत्यु झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी खूप प्रयत्न केले होते. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली.