Home » राजकारणी फिरवतात तसे तुम्ही फिरता; राज यांनी मिडियाला सुनावलं
आपलं राजकारण

राजकारणी फिरवतात तसे तुम्ही फिरता; राज यांनी मिडियाला सुनावलं


महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते, तर आज ते औरंगाबादेत होते. राज यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यांनी मीडियाला खडे बोल सुनावले आहेत, तसेच अनेक सवाल देखील उपस्थित केले आहेत.

त्यांनी सचिन वाझे, अंबानी, उद्धव ठाकरे, आर्यन खान यांच्या सारख्या अनेक विषयांवर आपली मते मांडली आहेत. राज म्हणाले नेहमी मूळ विषय बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या विषयाला पकडतो. यामुळे मूळ मुद्दा भरकटला जातो. राजकारणी लोक या संधीचा फायदा घेतात आणि पूर्ण प्रकरण फिरवलं जातं.

तुम्हाला जी माहिती दिली जाते तेच तुम्ही छापता. आता हेच पहा आर्यन खान प्रकरण जवळपास 28 दिवस सुरू होतं. ज्या दिवशी तो बाहेर पडला त्या नंतर कोणी विचारलं नाही, आता तो काय करतो, त्यांच्या प्रकरणाचा काय झालं? कोणी हे विषय दाखविले नाहीत. असेच काही सुशांत सिंह राजपूत आणि अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब प्रकरणांमध्ये देखील झाले. शेवटी काय तर तुमचा वापर केला जात आहे.

यातून काय घडत मूळ विषय राहतो बाजूला, परवा लोकसभेत एक माहिती दिली गेली ती अशी होती की मागील वर्षभरात पाच लाख व्यवसायिकांनी भारत देश सोडला. यावर कोणीच बातमी केली नाही. पाच लाख व्यवसायिक गेले म्हणजे तितक्याच नोकऱ्या देखील कमी झाल्या.

रोजगार संधी कमी झाल्या. आपल्याकडे आर्यन खान 28 दिवस चालतो पण बेरोजगारी यासारखे विषय समोर देखील येत नाहीत. वाझे प्रकरणातील गाडीचा शोध सर्वांनी घेतला पण पाच लाख व्यवसायिक कोठे गेले हे कोणी शोधले नाही. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत, अनेक उद्योग बरबाद होत आहेत पण हे विषय कोणीच मांडत नाही. राजकारणी तितकेच या स्थितीस जबाबदार आहेत. तसेच माध्यमे देखील तितकीच जबाबदार आहेत. भाजपाकडून किती जरी सांगितले गेले की महाविकास आघाडी पडणार आहे, पण मला असं वाटतं नाही. कारण यामध्ये तीन पक्ष एकत्र आलेले आहेत.