Home » मी केंद्रात मंत्री व्हाया फडणवीस, नारायण राणें यांच्या मंत्रीपदाच गुपित आलं समोर
आपलं राजकारण

मी केंद्रात मंत्री व्हाया फडणवीस, नारायण राणें यांच्या मंत्रीपदाच गुपित आलं समोर

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यातील एका कार्यक्रमात एका मंचावर उपस्थित होते. नारायण राणे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे, असा होतो. पण व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे.

दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो. दिल्लीत आता मी सुखी आहे. महिन्याला पुण्यात येणारा माणूस चार महिन्यांनी पुण्यात आला, तुमच्या माझ्यातील अंतर वाढवलं. याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत. असं नारायण राणे म्हणाले. हातातलं घड्याळं बीजेपीचं नाही, राष्ट्रवादीचं आहे. त्यामुळे थांबायला हवं. पुढे कार्यक्रम आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे आणि फडणवीस यांच्या एका मांचावरील जुगलबंदी चांगलीच रंगली होती. फडणवीस यांनी नारायण राणे यांना हात जोडले, जेव्हा राणेंनी फडणवीस यांना त्यांच्या मंत्री पदाचं श्रेय दिलं.नारायण राणे यांनी सेनेवर देखील जोरदार हल्लाबोल केला.