Home » सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंकडे; 19 पैकी 10 जागा जिंकल्या, आता कसं वाटतंय.. गार गार वाटतंय भाजपचा आनंदोत्सव
आपलं राजकारण

सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंकडे; 19 पैकी 10 जागा जिंकल्या, आता कसं वाटतंय.. गार गार वाटतंय भाजपचा आनंदोत्सव

आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (sindhudurg district central cooperative bank) निकाल जाहीर झाले आहेत, 19 पैकी 10 जागेवर भाजपने वर्चस्व मिळवल्यानंतर महाविकास आघाडीकडे (maha vikas aghadi) फक्त 5 जागा राहिल्या. उर्वरित जागेंवर मतमोजणी सुरु आहे. त्यातील मते कुणाच्या पारड्यात पडतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे मात्र नक्की आहे कि, जिल्हा बँकेवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे वर्चस्व निर्माण झालेलं आहे.

या विजयामुळे राणे (Nitesh Rane) समर्थक आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. ‘आता कसं वाटतंय..गार गार वाटतंय’ अश्या घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निकालाचा विजय जल्लोष साजरा केला.

ह्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सध्याचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचा पराभव झालेला आहे. त्या ठिकाणी भाजपचे विठ्ठल देसाई (Vitthal Desai) हे विजयी झालेत. दोघानाही त्या जागी समान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीमतदान घेण्यात आले आणि त्यात भाजपचे उमेदवार देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा भाराभाव झाल्याने भाजपलाही मोठा धक्का या निवडणुकीत मिळालाय. या निवडणुकीत भाजपची अवस्था हि गड आला पण सिंह गेला अशीच काहीशी झालीये.