Home » नवाब मालिक – एक भंगारवाला ते मंत्री असा आहे राजकीय प्रवास
Articles आपलं राजकारण

नवाब मालिक – एक भंगारवाला ते मंत्री असा आहे राजकीय प्रवास


नवाब मालिक मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे मंत्री आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाली आणि मालिक चर्चेत आले. मालिकांनी पोलिस अधिकारी समीर वानखेडे यांच्या टीका केली. अनेक आरोप देखील केले, तेव्हा पासून आज पर्यत मालिक चर्चेत आहेत.

विरोधी पक्षाने मालिकांवर टीका करताना त्यांना भंगारवाले देखील म्हणाले. मालिकांनी देखील होय आहे मी भंगारवाला असे म्हणत टीका स्वीकारली. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी नवाब मालिक एक भंगार व्यवसायिक होते. नवाब मालिक यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशांतील तेथे त्यांची शेती आणि व्यवसाय देखील होता.

त्यांची आर्थिक स्थिती ठीकठाक होती. त्यांचे वडील कामानिमित्त मुंबईत आले आणि मुंबईतच स्थायिक झाले. त्यांचे वडील भंगार आणि कपडे विकण्याचा व्यवसाय करत. मालिक यांनी देखील आमदार होई पर्यत भांगारचा व्यवसाय केला.

आज देखील मालिक यांचे कुटुंब हाच व्यवसाय करतात. आम्ही भंगाराचा व्यवसाय करतो आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे असे मालिक आवर्जून सांगतात. मालिक पुढे म्हणतात भंगारवाल्याची किमयागिरी काय असते हे लोकांना माहीत नाही. जी वस्तु उपयोगी नसते तो ती उचलून आणतो. त्यांचे एक एक तुकडे करतो.

शेवटी भट्टीत टाकतो आणि पाणीपाणी करतो. या शहरात जितके भंगार आहे त्या सगळ्याना खोलुन भट्टी टाकणार आहे. त्यांचे पाणीपाणी केल्याशिवाय राहणार नाही. असे देखील मालिक म्हणतात. मालिक कुटुंब सुरुवाती पासून डोंगरी परिसरात वास्तव्यास होते.

मालिक यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. मालिक जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सेंट जोसेफ शाळेत मोठ्या हौशीने घातले होते ,पण नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर त्यांना पुन्हा उर्दू शाळेत घातले. त्यांनी अनेक अडचणी बाजूला सारत बीए केले पण त्यांना काही कारणास्तव बीएची शेवटची परीक्षा देणे शक्य झाले नाही.

मालिक जेव्हा बीए करत होते तेव्हा ते त्यांचा व्यवसाय देखील संभाळत होते. दरम्यान मुंबई विद्यापीठाने महाविद्यायलीन फी वाढविली या निर्णयाला सर्व विद्यार्थी मित्रांनी विरोध केला. त्या विरोधात एक आंदोलन देखील केले. या आंदोलनात मालिक एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते. या आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्ज केला, यामध्ये मालिक जखमी झाले होते.

यावेळी मालिक यांना समजले की त्यांना राजकारणात रस आहे. ते त्यांचा व्यवसाय सांभाळत छोट्या-मोठ्या आंदोलनात आणि कॉंग्रेसच्या बैठकीत सहभागी होत. 1984 मध्ये मालिक यांनी लोकसभा निवडणूक लढविली त्यामध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते.

ते या निवडणुकीत पराजित झाले त्यांना अवघी 2620 मते मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जर तुम्हाला राजकारणात काम करायचे असेल तर कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. त्यांनी 1991 पासून कॉंग्रेससाठी काम सुरू केले. कॉंग्रेसने त्यांना तिकीट नाकरलं पण त्यांनी मात्र प्रयत्न सुरूच ठेवले. 1992 मध्ये मुंबईत बाबरी प्रकरणामुळे काही दंगली उसळल्या मालिकांनी त्यावेळीच सांज समाचार नावाचे वृत्तपत्र सुरू केले पण ते देखील काही काळात बंद पडले. 1995 मध्ये मालिक यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

त्यांना विधान सभेचे तिकीट देखील मिळाले. पण पुन्हा एकदा ते अपयशी ठरले. पण काही दिवसांत पुन्हा त्या मतदार संघात निवडणुका लागल्या आणि मालिक तब्बल साडेसहा हजार मतांनी विजयी झाले. 1999 साली मालिक यांनी समाजवादी पक्षातील राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

तेथे त्यांना मुस्लिम चेहरा म्हणून चांगला मान मिळाला. मालिकांवर आज पर्यत अनेक आरोप झाले पण मालिक मात्र मागे हटले नाहीत.