Home » ‘हि प्रजाती फक्त भंगारात आढळते’; नवाब मलिकांच्या अतरंगी फोटोनंतर नितेश राणे यांची पोस्ट
आपलं राजकारण झाल कि व्हायरल!

‘हि प्रजाती फक्त भंगारात आढळते’; नवाब मलिकांच्या अतरंगी फोटोनंतर नितेश राणे यांची पोस्ट

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलेल्या नकलेवर घमासान झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती आमदार नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची उडवलेल्या खिल्लीची.

मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात प्रवेश करताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत असलेल्या नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ‘म्याव-म्याव’ असा आवाज काढत डिवचल.

नितेश राणेंच्या या कृतीवर भाजपचे इतर आमदारही हसताना पाहायला मिळाले. आणि नितेश राणे घोषणेत मांजरीचे आवाज काढताना दिसत होते. नितेश राणेंच्या त्या कृत्यावर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिल गेलं.

आदित्य ठाकरेंच्या सार्थानात आता, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस सुद्धा सहभागी झाली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्वीटर वर फोटो शेंयर करत उत्तर दिल.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीटर कोंबड्याचा फोटो शेअर केला, पण तो कॉकटेल कोंबडा आहे. कोंबड्याच्या चेहऱ्यावर मांजरीचा चेहरा चिकटवण्यात आला आहे. आणि त्या फोटो वर पैचान कौन? अस लिहिलय. त्यानंतर त्या फोटोची काल जोरदार चर्चा झाली.

यानंतर, नवाब मलिक यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे नितेश राणेंना त्या फोटोने उत्तर दिल्याची चर्चा होती. आता नितेश राणे यांनी त्या फोटोला प्रत्युत्तर दिलंय. आमदार नितेश राणे यांनी आज ट्वीटरवर एक फोटो शेअर करतनवाब मलिकांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं. फोटोत त्यांनी हि प्रजाती फक्त भंगारात आढळते, असं कॅप्शन दिलं आहे.