देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडून आले आहेत.अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्ट च्या एका सर्वेमधून ही बाब समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.
पीएम मोदीचे अप्रूव्हल रेटिंग 71 टक्के 13 ते 19 जानेवारी दरम्यान या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधान तूलनेत पुढे आहेत. पीएम मोदीच्या लोकप्रियतेच्या आलेखात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्रोडोर , इटलीचे पंतप्रधान मारीयो द्राघी, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन या नेत्यांना मागे टाकले आहे.
नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान आहेत. मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. त्या नंतर आता पुन्हा परत ते पंतप्रधान आहेत. मोदी संपूर्ण जगात नेहमी चर्चेत असतात. त्यामुळे मोदीची लोकप्रियता अधिक आहे.