Home » संभाजी राजेंचा राजकीय गेम नेमकं कोण करतंय?
आपलं राजकारण काय चाललंय?

संभाजी राजेंचा राजकीय गेम नेमकं कोण करतंय?

जून महिन्यातील येणारी 10 तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण 10 जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. आता तुम्ही विचार कराल राज्यसभेची निवडणूक यंदा का खास आहे? दरवेळेस तर होतेच ना. पण यावेळेस मात्र महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेले आणि मानाचे असलेल्या भोसले घराणे या निवडणुकीत मैदानात आहेत.

संभाजी राजेंनी सर्व पक्षांना साद घातली आहे, पण शिवसेनेने मात्र त्यांच्या मावळ्यांना तिकीट देऊन सेनेने त्यांचा विषय बंद केला आहे. सेनेने राजेंना शिवबंध बांधा आणि उमेदवारी मिळवा, अशी ऑफर दिली होती. पण राजेंनी मात्र ती ऑफर नाकारली. आता राष्ट्रवादीची भूमिका काय? हे पाहूया, एक राज्यसभा सदस्य निवडण्यासाठी किमान 42 मते लागतात, राष्ट्रवादीकडे त्यांचा उमेदवार देऊन 10 जादाची मते उरतात. पवारांनी राजेंना पाठिंबा दर्शवीत उर्वरित 10 मते देण्याचे जाहीर केले.

संभाजी राजेंना 10 मते देऊ असे जाहीर करून पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एक म्हणजे मराठा समाजात चांगला संदेश जावा. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपा आणि सेनेचा दूसरा आणि तिसरा उमेदवार निवडणून येणार नाही यांची काळजी घेतली आहे.

भाजपाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपाचे दोन उमेदवार देऊन त्यांची आणखी काही मते उरतात ती मते आणि अपक्ष आणि इतर मते मिळून, भाजपा अजून एक उमेदवारी पाठवू शकतो. आता सेनेने त्यांची स्पष्ट भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीची भूमिका देखील स्पष्ट आहे. आता भाजपा राजेंना उमेदवारी घेऊन, मराठा समाजाची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

भाजपा आता राजेंना उमेदवारी देऊन सत्ताधारी पक्षाला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राजेनी सेनेत प्रवेश करू नये म्हणून पवारांनी बाहेरून पाठिंबा देत, एक वेगळी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. राजेंचा गेम कोणत्या पक्षाने केला.हे विचार करण्यासारखे आहे.