Home » 2010 ला मोदींची देखील 9 तास चौकशी झालेली, मग राहुल गांधींसाठी इतका बोभाटा का?
आपलं राजकारण

2010 ला मोदींची देखील 9 तास चौकशी झालेली, मग राहुल गांधींसाठी इतका बोभाटा का?

सध्या कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी भलतेच चर्चेत आहेत. राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले आणि संपूर्ण देशांत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी एकच गदारोळ घातला. 

सर्वत्र आंदोलने, निदर्शन सुरू केली, पण २७ मार्च २०१० रोजी देखील सध्याचे पंतप्रधान आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तब्बल ९ तास चौकशी एसआयटीने केली होती. त्यावेळी मोदींच्या चौकशीचा त्यावेळी इतका गाजावाजा झाला नव्हता. तितका राहुल गांधी यांचा झाला आहे.

सीबीआय, एसटीआय. एसआयटी, ईडी या सर्व सरकारी संस्था आहेत. या संस्थांचे संपूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकारकडे असते. त्यामुळे जेव्हा एखादा पक्ष सत्तेत येतो, तेव्हा त्या या संस्थाचा वापर विरोधीपक्षाला त्रास देण्यासाठी करतो. उच्च न्यायालयाने देखील कॉंग्रेसवर एकदा सीबीआयच्या वापरावरून ताशेरे ओढले होते. पण २०१० मध्ये नरेंद्र मोदी यांची राहुल यांच्या प्रमाणे कसून चौकशी झाली होती.

या चौकशी दरम्यान मोदी यांनी शासकीय सर्व यंत्रणेला मदत केली होती. नरेंद्र मोदी यांची तब्बल ९ तास चौकशी सुरू होती. मोदी यांनी या दरम्यान फक्त स्वता जवळील पाण्याची बॉटल घेतली होती. तपास यंत्रणेकडून त्यांनी एककप चहा देखील घेतला नव्हता.

२००२ मध्ये जेव्हा गुजरात गोध्रा हत्याकांड झाले होते, तेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन एसआयटी नेमून मोदी यांची चौकशी केली होती. त्यावेळी एसआयटीने कित्येकदा मोदीना चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी एसआयटीचे प्रमुख होते राघवन.

राघवन यांनी त्यांच्या पुस्तकात मोदी यांच्या या चौकशीविषयी सविस्तर लिहिले आहे. हे पुस्तक खूप गाजले होते. राघवन त्या पुस्तकात म्हणतात की नरेंद्र मोदी यांची तब्बल ९ तास चौकशी चालली होती. त्यांना या चौकशी दरम्यान तब्बल १०० प्रश्न विचारले होते. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी शांतपणे दिली होती.

राघवन यांनी आता पर्यत अनेक महत्वाच्या केसेसची चौकशी केली आहे. नरेंद्र मोदी यांची ज्यावेळी चौकशी केली गेली, त्यावेळी ते मुख्यमंत्री असून देखील अनेकदा चौकशीसाठी हजर झाले होते. राहुल गांधी यांच्या चौकशीच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेसने संपूर्ण देशभर गदारोळ केला.

कायदा सर्वानसाठी समान असताना कॉंग्रेसने असा गोंधळ घालणे कितपत योग्य आहे? कोणत्याही पक्षाला सत्तेत असताना प्रश्न विचारण्यासाठी विरोधी पक्ष तितकाच स्ट्रॉंग असावा. कॉंग्रेस विरोधी बाकावर आहे, पण कॉंग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर न उतरता गांधी घराण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. जनतेमध्ये मात्र एक वेगळीच चर्चा रंगली आहे, मोदीनी त्यांच्या त्या नऊ तासांच्या चौकशीचा सूड तर उगवला नाही ना? मोदीचे चाहते आणि भाजपाचे कार्यकर्ते मात्र म्हणत आहे एक वर्तुळ तब्बल १२ वर्षांनी पूर्ण झालं.