Home » राज ठाकरेंना नडणारे बृजभूषण सिंह त्यांच्याकडचा पैलवान आहे, हलक्यात घेऊ नका!
आपलं राजकारण

राज ठाकरेंना नडणारे बृजभूषण सिंह त्यांच्याकडचा पैलवान आहे, हलक्यात घेऊ नका!

राज ठाकरे यांनी त्यांचा 5 जून रोजी चा त्यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा रद्द केला. राज यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण त्यांना प्रकृती स्वास्थ्य ठीक नाही हे सांगितले आहे,पण सोशल मिडियावर मात्र नेटीयन्स म्हणतात की, बृजभूषण सिंह यांनी राज यांना रोखले. राज यांना रोखणारे बृजभूषण सिंह हे देखील त्यांच्या राज्यांत राज इतकेच लोकप्रिय आहेत. आजच्या लेखात आपण, बृजभूषण सिंह कोण आहेत? हे जाणून घेणार आहोत.

बृजभूषण सिंह यांच्या कुटुंबाला स्वातंत्र्य सेनानीचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील देखील राजकारणात होते. ६ भावांचे भले मोठे कुटुंब ते बीसनोहरपुर येथे राहतात. बृजभूषण सिंह यांना लहानपणी पासूनच व्यायामाची आवड होती. रोज पळायला जाणे,कुस्ती खेळणे हे त्यांचे आवडते शौक होते. कुस्तीत रस वाढत गेला आणि बृजभूषण सिंह पैलवान बनले.

पैलवान बृजभूषण सिंह यांचे कुस्तीमुळे जवळपासच्या ८ -१० जिल्ह्यात नाव झाले. कुस्ती, घोडेस्वारी यामुळे कमी कालावधीत त्यांनी प्रचंड लोकप्रियता कमावली. पुढे कॉलेजमध्ये देखील तितकीच प्रचंड प्रसिद्ध कमावली. युवा नेता म्हणून कॉलेजमध्ये बृजभूषण सिंह यांना वेगळी ओळख मिळवली.

विद्यार्थी नेता ते तब्बल ६ वेळा खासदार झालेले बृजभूषण सिंह यांची पैलवान लोकांमध्ये ऊठबस असते. बृजभूषण सिंह सध्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. राम मंदिर पाडल्यानंतर बृजभूषण सिंह पहिल्यांदा खासदार झाले होते. बाबरी मशिदीचा घुमट पाडल्या प्रकरणी ज्या ४० लोकांवर गुन्हे नोंदविले गेले त्यातील एक म्हणजे बृजभूषण सिंह होय.

बृजभूषण सिंह यांनी अनेक आंदोलने केली आहेत. आंदोलन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ऊस परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे. राम जन्म भूमी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला, या दरम्यान त्यांची ओळख लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत झाली. बृजभूषण सिंह यांनी त्यांची राजकीय सुरुवात भाजपा पासून केली आहे.

मध्यंतरी काही दिवस ते सपामध्ये होते, पण परत त्यांनी घरवापसी केली. एक धगधगते हिंदुत्ववादी नेते म्हणून बृजभूषण सिंह यांची ओळख आहे. राज यांना त्यांनी फक्त इशारा दिला नाही, तर त्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अनेक साधू, महंत यांचे मोठे मेळावे घेतले आणि हे प्रकरण अधिकच ज्वलंत बनविले. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्या इशाऱ्यामुळे राज यांनी अयोध्या दौरा रद्द केला असे म्हटले जाते. नेटीयन्स देखील बृजभूषण सिंह यांच्या या भूमिकेचे कौतुक करत आहेत.