महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा जाहीर केला. संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली, राज आता हिंदू हदयसम्राट होणार का? मनसेने 5 जून ही अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली. महाराष्ट्रातून कार्यकर्त्याना जाण्यासाठी रेल्वे देखील बुक करण्यात आल्या. पण राज यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला.
आधी यूपीच्या नागरिकांची माफी मागा आणि मगच अयोध्येत पाऊल ठेवा, अन्यथा. काही कारणास्तव राज यांचा हा दौरा रद्द झाला. राज यांच्यावर सर्व बाजूनी टीका देखील झाली. पण काल रात्री मनसे कार्यकर्ते यांच्याकडून एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोला मनसेने कॅप्शन दिले. कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी. या फोटोमध्ये बृजभूषण सिंह आणि शरद पवार हे एका मंचावर आहेत.
शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या फोटोमध्ये आहेत. यावरून मनसेने राष्ट्रवादीवर आरोप केला आहे. राज यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे महाराष्ट्रातून सापळा रचला गेला आहे. हा दौरा रद्द होण्यामागे शरद पवार आहेत.
राज ठाकरे नेहमी शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. केतकी चितळे प्रकरण असो किंवा त्याआधीचे पण राज यांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. असे मनसे कार्यकर्ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात चुकीचे पायंडे पडत आहेत. हे राज ठाकरे चुकीचे म्हणत नाहीत. हे बरोबर आहे.