Home » सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही मात्र .. – राजेश टोपे
आपलं राजकारण आरोग्य

सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही मात्र .. – राजेश टोपे


लॉकडाऊनच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर उत्तर देताना राजेश टोपे यांनी सध्या तरी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे आणि लॉक डाऊनचा कोणताही विचार डोक्यात नाही. असं स्पष्ट केलं आहे.

मात्र संसर्ग खूप वाढला तर मात्र 700 मेट्रिक ऑक्सिजन कन्झ्मशन होऊ लागलं, की ऑटोमॅटिक लॉकडाऊन होईल. लॉकडाऊन विषयी गैरसमज ठेवू नका. असं देखील टोपे म्हणाले आहेत.राज्यात सध्या तरी शक्यता नाही. मात्र निर्बंध कडक होतील.असे टोपे यांनी स्पष्ट केले.