Home » राजीव गांधी असते तर १० वर्ष अगोदरच डिजिटल पेमेंट क्रांती झाली असती
आपलं राजकारण

राजीव गांधी असते तर १० वर्ष अगोदरच डिजिटल पेमेंट क्रांती झाली असती

राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांना भारताच्या संगणक क्रांतीचे जनक मानले जातात. राजीव गांधी यांच्याकडे दुरदृष्टी होती. टेलीफोनचे युग देखील राजीव गांधी यांच्या योगदानामुळे सुरू झाले. आज भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटलायजेशन झाले आहे. यांचे देखील राजीव गांधी यांना कोठे ना कोठे श्रेय जाते.

आज भारतात ६० कोटीहून अधिक लोक इंटरनेट वापरतात. पण डिजीटलायजेशन होण्यासाठी २०२० सालं उजडावं लागलं, पण राजीव गांधी असते तर १० वर्ष अगोदरच डिजीटलायजेशन झालं असतं. कारण टेलीफोन (Telephone) आणि संगणक क्रांती (Computer Revolution) तर ९० च्या शतकातचं झाली होती.

राजीव गांधी यांनी जेव्हा संगणक आणले होते, तेव्हा भाजपाने या निर्णयाला जोरदार विरोध केला होता, भाजपाचे म्हणणे होते की संगणकांमुळे हजारो लोक बेरोजगार होतील, पण संगणक क्रांतीचा सर्वाधिक फायदा भाजपाला झाला आहे. कारण विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई पेमेंट पर्यायांना मोठी चालना दिली आहे.

मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात फोन पे, गुगल पे वापरले जात आहेत (Digital Payments). इतिहासात जेव्हा जेव्हा संगणक आणि टेलिफोन यांचा विषय निघेल तेव्हा तेव्हा राजीव गांधी यांचे योगदान मान्य केले जाईल, अगदी जसे डिजीटलायजेशनचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दिले जाते. अगदी त्याप्रमाणे.