कवठेमहांकाळ नगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार देखील जोरदार झाला. आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी सभेत स्वताची एक वेगळी छाप निर्माण केली. 19 जानेवारीला जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा तुम्हाला माझ्या बापाही आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी भावनिक साद रोहित पाटील यांनी नागरिकांना घातली. आता ही भावनिक साद किती हदयापर्यत पोहचते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज मी जे पॅनल निवडलं, त्या सर्वसामन्य लोक म्हणतात की तुम्ही आमच्या मनातील पॅनल निवडलं. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सर्वसामन्य माणसानं खांद्यावर घेतलं. पक्षाची जबाबदारी सर्वसामान्य घेतली आहे. 19 जानेवारीला जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा तुम्हाला माझ्या बापाही आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे रोहित पाटील म्हणाले राष्ट्रवादी पक्षाकडे पुढील 25 वर्ष सांगली कसे असेल याचं व्हीजन तयार आहे.सध्या कोणतं काम सुरू आहे, कोणती कामे केली पाहिजेत, यांची सर्व माहिती मला माहीत आहे.
कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांचा विकास झालाच पाहिजे हीच आमची भावना आहे. पंधरा वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती. नगरपंचायत होती, तेच लोक आज पुन्हा एकत्र आदर्श नगरपंचायत घडविण्यासाठी एकत्र आलो आहोत. मी इथल्या सर्व भागात फिरलो आहे. मला समस्या माहीत आहेत.