Home » Video: ‘आता 23 वर्षांचा आहे, 25 पर्यत कोणालाही शिल्लक ठेवणार नाही..’
आपलं राजकारण

Video: ‘आता 23 वर्षांचा आहे, 25 पर्यत कोणालाही शिल्लक ठेवणार नाही..’


सांगलीत सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जोरदार प्रचार चालू झाला आहे. विरोधक आमने- सामने आले आहेत. एकमेकांवर टीकेची झोड उठविली गेली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते आर.आर पाटील यांचा मुलगा रोहित (rohit patil) पाटील सध्या राजकारणात सक्रिय झाला आहे.

कवठेमहांकाळ येथे त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय विरुद्ध रोहित असा सामना तेथे रंगला आहे. रोहित यांनी कवठेमकांळ येथील निवडणूक राष्ट्रवादीने एकट्याने लढायची असा निर्णय घेतला, हा निर्णय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याना आणि नेत्याना काही पटला नाही. त्यांनी रोहितला विरोध केला. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र उभारले आहे.

काल कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीची प्रचार सभा झाली. त्यावेळी पक्षातील एक ज्येष्ठ नेते म्हणाले अवघ्या 25 वर्षांच्या मुलांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले आहेत. त्यावर रोहित म्हणाला राष्ट्रवादी पक्ष आणि आबांच कुटुंब तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचले आहे. सर्व पक्ष एका बाजूला आणि पक्षाचे निष्टावंत कार्यकर्ते एका बाजूला असं चित्र निर्माण झाले आहे. येणारा काळ असा भीमटोला देईल ते पहा. माने सर आपण सांगितलं 25 वर्षांच्या तरुणाला सर्व हरवायला निघाले आहेत, पण माझं वय 23 आहे आता 25 होईपर्यत काही शिल्लक ठेवत नाही (rohit r patil).