महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील महिला आघाडीच्या महत्वाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे स्पष्ट केले. पण त्या कोणत्या पक्षात जाणार त्यांनी हे सांगितलं नव्हतं. पण आज मात्र रुपाली पाटील यांनी ट्विट करत त्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचे स्पष्ट केले.
या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे, ते ट्विट असे आहे. आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे हात नाहीत, व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत, हो म्हणूनच ठरलं, आता या वटवृक्षांच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार. हे ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडीला, कॉंग्रेस आणि शिवसेनेला टॅग केले आहे.
राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच मनसेला मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील मनसेच्या स्थापनेपासून एक खंबीर कार्यकर्त्या होत्या. पक्षाच्या चढ- उतारच्या काळात त्यांनी नेहमी पक्षाची साथ दिली होती पण आता मात्र महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षाला रामराम केला आहे.
आज त्या मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांना देखील रुपाली पाटील यांनी भावनिक पत्र लिहिलं आहे. त्या म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.पण जारी मी राजीनामा दिला त्री तुम्ही माझ्या कायम हदयात रहाल. आपण नेहमी दिलेलं बळ आणि संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहिलं. आपले आशीर्वाद यापुढे देखील रहावेत. असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.