शरद पवार यांनी अजित पवार आणि फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काही तासांच्या सरकारवर एक टिप्पणी केली. शरद पवार म्हणाले मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं, असं अर्धवट सरकार स्थापन केलं नसतं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. आम्ही काहीही लपवत नाही. शरद पवार सांगत आहेत त्यामुळे हे सत्य असावं. भाजपा (BJP) सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला, अजित पवार यांना गाठा असे उपक्रम सुरू होते.”
“शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला ऑफर आली होती हे देखील आम्हाला माहीत होते. ते आमच्याशी बोलले होते. त्या काळात आम्ही संपर्कात होतो, आमच्यामध्ये पारदर्शकता होती. आमच्याकडे काही गुप्त नव्हते. कोण कोणाशी बोलत आहे, कोण कोणाला भेटत आहे, हे सर्वांना माहीत होते. अजित पवार शपथविधी घेण्यासाठी गेले तेव्हा देखील आमच्यामध्ये पारदर्शकता होती. आमच्यामध्ये संवाद होता, पारदर्शकता होती त्यामुळे संध्याकाळ पर्यत सर्व आमदार परत आले. अजित पवार देखील परतले.” असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.