जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला, त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यालयावर दगड फेक केली. या घटनेचा विडियो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरलं झाला आणि सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगली.
“रामराजे निंबाळकर देखील बैठकीला उपस्थित होते, त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले पण ते किती प्रामाणिक होते हे माहीत नाही” असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
शिंदेचा पराभव होता की कारस्थान अशी चर्चा सर्वत्र होत आहे. राष्ट्रवादीने जरी शशिकांत शिंदे यांना तिकीट दिले असले तरी पक्षातील मोठ्या नेत्यांनी शिंदे यांना मदत केली नाही. त्यामुळे त्यांना हा पराभव सहन करावा लागत आहे. असे मत काही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत मात्र शशिकांत शिंदे यांनी ही बाब नाकारली आहे.
शरद पवार साहेब आणि अजित पवार यांनी स्वता माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत, मात्र काही गोष्टी वेगळ्या घडल्या आहेत. आम्ही गाफील राहिलो. रामराजे निंबाळकर देखील बैठकीला उपस्थित होते, त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले पण ते किती प्रामाणिक होते हे माहीत नाही असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे देखील राष्ट्रवादीत होते. ते एक सर्व सामान्य कार्यकर्ते होते. शशीकांत शिंदे मात्र दहा वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक म्हणून निवडून गेलेले होते. सामान्य कार्यकर्त्यास संधी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या एका गटाने केली होती पण शरद पवार आणि शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला होता.
यामध्ये रांजणे यांना माघार घ्यावी लागली होती. या निर्णयानंतर रांजणे यांनी स्वतंत्र्य निवडणूक लढविली आणि शशीकांत शिंदे यांना अवघ्या एक मताने पराभूत केले. रांजणे यांना मदत करणार हा एक गट नेमका कोणता , खरचं शशिकांत शिंदे यांना मोठ्या नेत्यांनी मदत केली नाही . या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे, पण कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याच कार्यालयावर हल्ला केला आहे, ही बाब मात्र साताऱ्यात राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब आहे.