Home » म्हणून एका तरुणाने पत्रकारांसमोर शरद पवारांच्या कानाखाली लगावली होती
आपलं राजकारण खास किस्से

म्हणून एका तरुणाने पत्रकारांसमोर शरद पवारांच्या कानाखाली लगावली होती

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरलेलं नाव, त्याचं वय, त्यांचा अनुभव यामुळे महाराष्ट्रात त्यांची स्वतःची एक वेगळी जागा आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्याशी निगडीत अशा अनेक घटना घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचलं आहे. परवा रात्री मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांवर टीका करणारी एक पोस्ट केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापले.

केतकी चितळे हिच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुन्हे नोंदविले गेले. मागील काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांचा संप फार चिघळला होता, या संपाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांना घेऊन, शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला. चप्पल भिरकावल्या. यापूर्वी देखील शरद पवार यांच्यावर असाच एक हल्ला 2011 साली झाला होता. 2011 साली शरद पवार कृषि मंत्री होते.

तेव्हा एका पंजाबी तरुणाने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच गदारोळ माजला होता. शरद पवार एक कार्यक्रम उरकून निघाले होते, जेव्हा ते बाहेर आले तेव्हा पत्रकारांना ते प्रतिक्रिया देत होते, तेव्हा अचानक एक पंजाबी तरुण आला आणि त्याने शरद पवारांच्या कानाखाली वाजविली. ही घटना इतकी अचानक घडली की कोणालाच काही समजले नाही. पोलीसांनी त्या तरुणाला लगेच ताब्यात घेतले, त्या तरुणांचे नाव अरविंद सिंह असे आहे.

अरविंद सिंहला कोठडीत टाकले पण तो तेथून देखील पसार झाला. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही. कोर्टाने त्याला 2014 साली फरार घोषित केले. अरविंद सिंह हा तब्बल 8 वर्ष फरार होता, त्यांचा काहीच पत्ता नव्हता, अखेर 2019 मध्ये तो पोलिसांना सापडला. अरविंद याला विचारण्यात आले होते की त्याने शरद पवार यांच्यावर हात का उचलला, त्यावर तो म्हणाला ते भ्रष्टाचार करतात त्या रागामुळे हात उचलला.