Home » 2019 ला महावि आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये सांभाळण्याची जबाबदारी अनिल परबांनी चोख बजावलेली
आपलं राजकारण

2019 ला महावि आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये सांभाळण्याची जबाबदारी अनिल परबांनी चोख बजावलेली

सरकार स्थापन होण्याआधी आमदार फुटू नये म्हणून सगळ्यांना एकाच हॉटेलात सांभाळण्याची जबाबदारी पेलणारे अनिल परब विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक आहेत 

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरासह इतर अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अतिशय महत्वाचे असणारे व् कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे आणि कायम पडद्यामागे असणारे मंत्री अनिल परब आहेत तरी कोण ? हाच मोठा प्रश्न अनेकांना पडलाय. अनिल परब मागील 20 वर्षापासून शिवसेनेत आहेत. एक सामान्य कार्यकर्ता ते सेनेतील अतिशय महत्वाचा नेता असा परब यांचा राजकीय प्रवास आहे.अनिल परब यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातील केबल ऑफरेटर म्हणून अनिल परब यांनी काम केले.

पुढे विद्यार्थी सेना, केबल ऑफरेटर संघटना अशा अनेक संघटनामध्ये परब यांनी महत्वाची भूमिका निभावली. सेना जी जबाबदारी देईल ती चोख पार पाडणारे नेते म्हणून अनिल परब यांची सेनेत ओळख आहे.

सेना असो किंवा आताची महाविकास आघाडी कायद्याची बाजू अनिल परब एक हाती सांभाळतात. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले. तेव्हा देखील अनिल परब यांनी चोख उत्तर दिले. कायद्याची बाजू मांडत देवेंद्र फडणवीस यांना योग्य देखील उत्तर दिले.

2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात येत असताना देखील अनिल परबांनी फार महत्वाची भूमिका पार पाडली होती, त्याचं झालं असं की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकला. अजित पवार यांनी मात्र काही वेळानंतर राजीनामा दिला. ते पुन्हा महाविकास आघाडीत परतले. त्या नंतर महाविकास आघाडी तर्फे सत्ता स्थापनेला वेग आला.

अशावेळेस आमदार फुटू नयेत म्हणून महाविकास (MVA) आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. हॉटेलमध्ये ठेवलेल्या सर्व आमदारांना सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी देखील अनिल परब यांनी चोख पार पाडली होती. अनिल परब यांच्या या सर्व कामाची दखल घेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.