Home » ‘देश विकलात, पण आता अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
आपलं राजकारण

‘देश विकलात, पण आता अयोध्या विकता येणार नाही; कारण..’

अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो बघून भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त एक व्यवहार आहे. त्यांना मंदिर पाहिजेत ते फक्त जमिनी लाटण्यासाठीच. त्यांचे ढोंग श्रीरामाच्या कृपेनेच उघडे पडले असं म्हणायला हवं. इडी, सीबीआयने एखादे कार्यालय कायमस्वरूपी अयोध्येतच उघडायला हवं. नंतर मथुरा आहेच. अशी टीका शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून केली.

‘राम नाम सत्य’ हे इतरांसाठी. भाजपला फक्त जमिनी आणि पैसा हे इतकच सत्य आहे! लोकांना देवाच्या आळंदीत जातोय अस वाटत असलं तरी भाजप चोराच्या आळंदीत घेऊन चालले. अयोध्येला चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाही! देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा घेऊन उभी आहे. असही इशारा शिवसेनेकडून भाजपला देण्यात आला.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक भागवत, योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, पण त्यानंतर तेथील भाजपच्या व्यापारी मंडळीनी मंदिर परिसरातील मोठ्या प्रमाणातील जमिनी खरेदी करून गुंतवणूक केली. राममंदिर परिसरातील चार-पाच किलोमीटर परिसरातील कोट्यावधींची जमीन खरेदी व्यवहार खरेदी केल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे. यांनी आज खरेदी केलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर सुरु केलेला व्यापार आहे. मंदिरासाठी कोण लढले? रक्त कुणाचे सांडले? मेले कोण आणि मंदिराच्या नावावर मलिदा खाणारे कोण? हे एक गैद्बंगाल आहे. असे असंख्य आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.