Home » दाउदच्या गुंडांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या आनंद दिघे यांची थरारक कहाणी
आपलं राजकारण खास किस्से

दाउदच्या गुंडांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या आनंद दिघे यांची थरारक कहाणी

शिवसेना महाराष्ट्रात स्थापन झाली, रुजली आणि वाढली देखील. शिवसेनेचे महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशांत एक वेगळेच नाव आहे. शिवसेना खऱ्या अर्थाने वाढली ती म्हणजे कट्टर शिवसैनिकांमुळे. शिवसेनेत आज देखील असे अनेक शिवसैनिक आहेत जे सेनेशी तितकेच प्रामाणिक आहेत. असाच एक कट्टर शिवसैनिक म्हणजे आनंद चितांमणी दिघे होय.

आनंद दिघे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे कार्यकर्ते होते, ठाण्यात शिवसेना घराघरात पोहचली, ती फक्त आणि फक्त आनंद दिघे यांच्यामुळे दिघे यांना जाऊन आता 20 वर्ष होत आली तरी देखील आनंद दिघे यांचे नाव ठाण्यासोबत जोडलेले आहे.

संपूर्ण शिवसेनेत बाळासाहेब आणि ठाण्यात आनंद दिघे असं पक्क समीकरण होतं. आनंद दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 रोजी ठाण्यातील टेंभी नाका येथे झाला. ठाण्यात बाळसाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा होत, आनंद त्या सभांना उपस्थित राहत असे, त्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाणी आणि व्यक्तिमहत्व यामुळे अनेक तरुण सेनेत दाखल झाले होते. आनंद देखील शिवसैनिक बनले. आनंद यांच्यावर शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरे यांची इतकी छाप होती की दिघे यांनी दिवस-रात्र सेनेसाठी स्वताला वाहून घेतले.

त्यांनी लग्न देखील केले नाही.त्यांचे सेनेप्रति असलेले प्रेम पाहून लवकरच त्यांच्यावर ठाणे जिल्हा जिल्हाप्रमुख ही जबाबदारी सोपविण्यात आली. आनंद यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि त्या नंतर ते घरी देखील जात नसत, ते सेनेच्या कार्यालयात राहत असे. त्यांच्या घरी आई, वडील,बहीण हे होते पण ते घरी जात नसे. त्यांची आई त्यांना डब्बा पाठवत असे. दिघे नवरात्री उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा करत.

त्यांच्या नवरात्र उत्सवाला अनेक नेते, सिनअभिनेते येत. 2001 साली गणेशउत्सव सुरू होता.त्या दरम्यान आनंद दिघे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघाता नंतर त्यांच्यावर सिंघानिया हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. त्यांची एक शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्या नंतर त्यानं हदयरोगाचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

दिघे यांच्या निधनाची बातमी संपूर्ण ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली, शिवसैनिकांनी सिंघानिया हॉस्पिटलकडे धाव घेतली. शिवसैनिकांनी चक्क हॉस्पिटलच पेटवून दिलं. हॉस्पिटलचे 200 बेड जळून खाक झाले होते.