मंत्रीपद मिळाल्यानंतर अनिल परब यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. असा आरोप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. रामदास कदम म्हणतात, अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण गेली दोन वर्ष ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्हात येतात.
पालक मंत्री म्हणून त्यांनी कोणतंच काम केलेलं नाही. मला राजकीय आयुष्यातून उदध्वस्त करण्याचा कट आहे.तथाकीत ऑडिओ क्लिप आली होती. त्यामध्ये मी पक्षाच्या बाबतीत काहीही बोललो नाही.बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, किरीट सोमय्याना कुठलेही कागदपत्र दिले नाही. पक्षाला हानी होईल असं काहीही केलं नाहीय.दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नये मी काही पथ्य पाळले होते.
अनिल परब यांच्याविरोधात बोलण म्हणजे पक्षावर बोलण नव्हे. मी शिवसेनाप्रमुखांचा मावळा आहे. रामदास कदमाना पक्षातून बाजूला करा असा डाव सेनेतल्या नेत्यांचा आहे. मी अनिल परबांना आव्हान देतो की वांद्रेमधून विधानसभेला उभं राहून निवडून येऊन दाखवा. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असता म्हणजे तुम्ही शिवसेनेतील नेत्याला संपवाल असं नाही. माझ्या मुलाला योगेश कदमला तिकीट देऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर घेऊन गेले होते.
माझ्या मुलाला तिकीट दिलं अनिल परबाना राग आला. योगेश कदम बद्दल सूडाची भावना ठेवली.मनसेनेते वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना अनिल परब पाठीशी घालत आहे. स्थानिक आमदारांना डावलण्याचं काम अनिल परब यांनी केलं आहे. ज्यांनी इथं राष्ट्रवादीला गाडलं त्यांनाच बाजूला केलं जातंय. शिवसेना म्हणजे काय हे उदय सामंत शिकवतोय. पक्षासाठी आम्ही 52 वर्ष घालवली आहे. उद्धव साहेबांना आठवण करून देतो, की पक्षाची वाईट वेळ होती तेव्हा समोरच्या सीटवर मी बसलेलो असायचो. शिवसेना प्रमुख उद्धव साहेब आहेत की अनिल परब आहेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.