Home » छ.शिवरायांना मानणारे महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री
आपलं राजकारण

छ.शिवरायांना मानणारे महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री

महाराष्ट्रात राजकारण सध्या प्रचंड तापलेलं आहे. निवडणुका आल्या की एकच मुद्दा चर्चिला जातो, तो मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा.छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मुद्दा पुढे केला जातो आणि प्रत्येकजण चर्चेत येतो. पण छत्रपती शिवाजी महाराज याचं नावं निवडणुका पुरते पुढे केले जाते आणि नंतर मात्र त्यांचा विसर पडतो.

पण आज देखील महाराष्ट्रात जेव्हा हिंदू- मुस्लिम विषय निघतो, तेव्हा एक मुस्लिम शिवप्रेमीचं नाव म्हणजे, ए.आर. अंतुले. १९८० च्या लोकसभा निवडणूकेत इंदिरा गांधीच्या यांच्या कॉंग्रेसने फार मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी पूलोदच्या सरकार बरखास्त करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. इंदिरा गांधी यांनी बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री बनविले. बॅरिस्टर ए.आर.अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बनले.

तसेच कोकणातील पहिले मुख्यमंत्री बनले. अंतुले हे स्वता कोकणातले होते आणि शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यांची राजधानी रायगड ही देखील कोकणात होती. त्यामुळे अंतुले यांना या गोष्टीचा फार अभिमान होता.

त्यांनी कुलाबा हा जिल्हा होता, तेथे रायगड हा किल्ला होता. त्यांनी कुलाबा नाव बदलले आणि त्या जिल्ह्याचे नाव रायगड केले. अंतुले यांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर होता, त्यांनी इतिहास कारांची एक समिती स्थापन केली.

गड- किल्ल्याचे संवर्धन यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. यातून अंतुले यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची निष्टा दिसून येते. अंतुले यांनी एक वेगळी ओळख होती ती म्हणजे शिवप्रेमी अंतुले.