Home » थेरगावच्या क्वीनला पोलिसांनी शिकवला धडा
आपलं राजकारण झाल कि व्हायरल!

थेरगावच्या क्वीनला पोलिसांनी शिकवला धडा


सोशल मीडियावर असंख्य विडियो व्हायरलं होत असतात. कोणी कोण कधी प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. लाईक्स्, कमेन्ट आणि शेअर यांच्यामध्ये तरुणपिढी अडकली आहे. प्रसिद्ध होण्यासाठी कोणी कधी काय करेल याबद्दल न बोलणे उत्तम ठरेल. काल पासून सोशल मीडियावर पिंपरी-चिंचवड मधील एक मुलगी प्रचंड व्हायरलं झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे नेमकं प्रकरण.

शिवीगाळ करत अश्लिल विडियो आणि धमकी देणारे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलं होत होते.थेरगाव क्वीन या नावाने हे अकाऊंट होते. लेडी डॉन म्हणून ही मुलगी सोशल मीडियावर स्वता मिरवत होती. लेडी डॉन म्हणून मिरवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी मात्र चांगलीच अद्दल घडविली आहे.

या तरुणीवर तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तिच्या मित्रांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी महाले असं त्या मुलीचं नाव आहे. ही मुलगी स्वताला पिंपरी-चिंचवडमध्ये स्वताला स्वयंम घोषित लेडी डॉन असे म्हणत.

या मुलीचे इंस्टाग्रामावर 50 हजार इतके फॉलोवर्स आहेत. ही मुलगी रोज शिव्या देणारे विडियो पोस्ट करत तसेच एकदा तर चक्क तिने खून करण्याची धमकी देखील दिली. 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केले आहे. साक्षी आणि कुणाल कांबळे हे दोघे आणि त्यांचे काही मित्र मिळून इंस्टाग्रामावर थेरगाव क्वीन नावाने एक प्रोफाइल बनवून लोकांना धमकावत तसेच त्यांच्या घाणेरड्या शिव्या देणारे विडियो देखील बनवत.

इंस्टाग्रामावर असे रील्स देखील बनविले होते. हा त्यांचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यामुळे अनेकांनी या टोळी विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तातडीने या टोळीवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केले आहे. साक्षीला वाकड पोलिसांनी अटक करत तिच्यावर 292,294,506,आणि आयटीआय अॅक्ट नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला.