यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मिशन गंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र भारताच्या शेजारील देश म्हणजे पाकिस्तानने मात्र अशी कोणतीच मोहीम आखलेली नाही. भारता प्रमाणे पाकिस्तानमधील देखील अनेक विद्यार्थी यूक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहेत.
पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी अखेर भारताकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानी विद्यार्थी भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊन,, रुमाणिया बुखारेस्ट या विमानतळावर थांबले आहेत. काल नाशिकमधील एक विद्यार्थी रिद्धी शर्मा ही भारतात परतली तिने तेथील ही स्थिती सांगितली आहे.
रिद्धी म्हणते भारतीय दूतावास अनेक विद्यार्थ्यांना मदत करत आहे. भारताप्रमाणे पाकिस्तानमधील अनेक विद्यार्थी त्या विमानतळावर अडकले आहेत. त्यांना देखील त्यांच्या मायदेशी परतायचे आहे पण त्यांच्या देशाने अजून तरी काही व्यवस्था केलेली नाही. हे विद्यार्थी भारतीय तिरंगा ध्वज हाती घेऊन आपल्याकडे मदत मागत आहेत. आपले अधिकारी देखील वैर भाव विसरून त्यांना होईल तितकी मदत करत आहेत.
हे अधिकारी विद्यार्थ्याना दिलास देखील देत आहेत. विद्यार्थी रुमानियाच्या बुकारेस्ट विमानतळावरून आपल्या मायदेशी परतत आहेत.सध्या यूक्रेनमधील स्थिती अतिशय भयानक बनली आहे. यूक्रेनमध्ये 15000 हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी अजून देखील अडकून पडले आहेत.