Home » आता सरचिटणीस झालेले विनोद तावडे तेव्हा भाजप सोडणार हे निश्चित झालं होत
आपलं राजकारण

आता सरचिटणीस झालेले विनोद तावडे तेव्हा भाजप सोडणार हे निश्चित झालं होत

सध्याचं राजकारण खूप अवघड झालं आहे, नेते आणि कार्यकर्ते संभाळणे अवघड होऊन बसलं आहे. नाराजी नाट्य तर नित्याचं झालं आहे. त्यामुळे निष्टावंत कार्यकर्ते मिळवण्यासाठी पक्षाला भाग्य काढावं लागत आहे. काही थोडं झालं की अगदी मोठ्या मंत्र्यांपासून ते अगदी कार्यकर्त्यापर्यत सर्व पक्षांतर करण्यास सज्ज असतात. पण भाजपाचे निष्टावंत माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे मात्र या गोष्टीस अपवाद ठरतात.

दिनांक 28 ऑक्टोबर 2014 भाजपाचा विधीमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी विधानभवन परिसरात एकच लगबग सुरू होती. विनोद तावडे तेव्हा देखील एक जबाबदार नेते होते. तावडे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या गाडीकडे केले मात्र सिंह यांच्या बॉडी गार्डने त्यांना धक्काबुक्की केली.तरी देखील तावडे यांनी सिंह यांच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मग मात्र त्या बॉडी गार्डने तावडे यांच्या बखोटीला धरून खेचले. या घटनेकडे राजनाथ सिंह यांनी देखील कानाडोळा केला. तावडेंचा मोठा अपमान झाला. या घटनेचा विडिओ व्हायरलं झाला.मग काय महाराष्ट्रात एकच चर्चा झाली. विरोधी पक्षानी तर तावडेंची मोठी खिल्ली उडविली.तावडे दुखावले गेले पण ते शांत राहिले. पुन्हा विधान सभेच्या निवडणुकीत तावडे यांचे तिकीट कापले.

तावडे भाजपचे जूने आणि संघाच्या तालमित तयार झालेले नेते आहेत. तिकीट कापल्यामुळे तावडे नाराज असले तरी त्यांनी पक्ष निष्टा राखली. तावडे यांच्याकडे भाजपाने दुर्लक्ष केले, तावडे नाराज आहेत, अशा अनेक चर्चाना उधाण आले होते, पण तावडे मात्र शांत होते.त्यांनी त्यांच्या कामांनी आणि संयमाने भाजपातील मोठ्या नेत्यांची  मने पुन्हा जिंकून घेतली आणि राष्ट्रीय सरचिटणीस पदाची माळ स्वताच्या गळ्यात पाडून घेतली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या  नंतर  महाराष्ट्रातून पाहिल्यांच विनोद तावडे `यांना इतकी मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे पक्ष कोणता ही असो किंवा कोणतेही काम संयम आणि निष्टा तितकीच महत्वाची हे तावडे यांनी पुन्हा सिद्ध केले आहे.